0)कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे शिक्षकांचे दोन दिवसाचे उदबोधन वर्गास शिक्षकांना पाठविणेबाबत. 1)अध्यापक विद्यालयांचे सन २०१६-१७ चे संच मान्यता प्रस्तावाबाबत. 2)सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पध्दतीने करणॆबाबत.(दि. ०४.१२.२०१६ रिजी नियोजित वेळापत्रकात बदल आहे.)...त्यासाठी हे परित्रक वाचा ही विनंती 3)वार्षिक क्रीडास्पर्धा आणि आरोग्य व शारीरिक शिक्षण विषायाच्या कामकाजाबाबत..( गुरुवार १.१२.२०१६ रोजी स. ११ वा. बैठक)..त्यासाठी हे परित्रक वाचा ही विनंती 4) खाजगी मान्यता प्राप्त अनुदानित व विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालये यांचे पदभरतीला एनवोसी देणेबाबत. (दिनांक ०१.१२.२०१६ रोजी समक्ष शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे या कार्यालयातील उच्चमाध्यमिक शाखेत सादर करावी. )...त्यासाठी हे परित्रक वाचा ही विनंती...(नविन ). 5)सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पध्दतीने करणॆबाबत.(माध्यमिक शाळा सलग्न उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ माहाविद्यालयातील उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक ही पदे कनिष्ठ महाविद्यालयांच्या विद्यार्थी संख्येवर देय ठरत असल्याने पुणे जिल्हयातील फक्त अनुदानित माध्यमिक शाळा संलग्न उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालये यांची फक्त संच मान्याता व कार्यभार निश्‍चिती सोबतच्या वेळापत्रकानुसार करण्यात येणार आहे .....तरी हे परित्रक वाचा ही विनंती... 6)सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पध्दतीने करणॆबाबत. शिबीर रद्द (भोर,वेल्हा,मवळ,बारामती,सासवड,इंदापूर,दौंड(दि.२९.११.२०१६ ते ०१.१२.२०१६) या तालुक्यातील संच मान्यता शिबीर रद्द करण्यात आलेले आहे, कारण शिक्षक-शिक्षेत्तर पदे भरतीबाबत नाहारकत प्रमाणपत्र देणेसाठी तातडीची बैठक असल्या कारणाने . ******* तरी या सोबत सुधारीत वेळापत्रक दिलेले आहे ते पाहावे हे महत्वाचे********
शिक्षण उपसंचालक पुणे विभाग.

खरे बौध्‍दिक शिक्षण हे शरीरावयवांच्या - हात, पाय, डोळे, नाक इत्यादींच्या योग्य वापरातूनच होऊ शकते. म्हणून मुलाच्या शिक्षणाला प्रारंभ करताना त्याला एखादा उपयुक्‍त असा हस्तव्यवसाय शिकविणे व तद्‍द्वरा उत्पादन करण्याची क्षमता त्याच्या मध्ये निर्माण करने याला मी प्राधान्य देईन ..... महात्मा गांधी


शालेय शिक्षण विभागांतर्गत येणार्‍या मा.शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, पुणे यांच्या अधिनस्त कार्यरत असलेले विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे, हे कार्यालय १७, डा.आंबेडकर मार्ग, पुणे-१ येथे स्थित आहे. महाराष्‍ट्र राज्याची शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरामध्ये पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे हे कार्यालय निर्माण केलेले आहे.

शासनाच्या मह्सूल विभागाचा विचार करता पुणे मह्सूल विभागातील पुणे व सोलापुर व नाशिक मह्सूल विभागातील अहमदनगर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक , निरंतर शिक्षण व आध्यापक विदयालय या संदर्भातील शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज क्षेत्रिय अधिकार्‍यांच्या मदतीने पार पाडले जाते.


शिक्षण उपसंचालक (आवाहन)

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.

अधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा